Korpana : देशभरातील विविध विद्यार्थी प्रश्नांसह लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी कोरपना येथे विद्यार्थी,सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत विराट मोर्चा काढण्यात आला.
शहरातील बसस्थानक परिसरातून प्रमुख मार्गाने निघालेल्या या मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी,विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.आंदोलनकर्त्यांनी NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार व गोंधळाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा,अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी सोनम वांगचुक यांनी उपस्थित केलेल्या जनहिताच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांमार्फत सरकारला निवेदन सादर केले.विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेऊन देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवावा,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.आंदोलनात काँग्रेस,शेतकरी संघटना,शिवसेना (UBT),जन सत्याग्रह संघटना आदी राजकीय पक्षांचे पदाधिकारी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी,विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान,इतर ठिकाणांसह जिल्ह्यातील चंद्रपूर,बल्लारपूर,राजुरा, कोरपना.... येथे विद्यार्थी प्रश्नांवर मोर्चे निघाले.असे असताना गडचांदूर शहर मात्र,या आंदोलनापासून अलिप्त राहिल्याची चर्चा रंगली. "येथे विद्यार्थी नाहीत का? पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता नाही का? सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे नेते असतानाही या प्रश्नावर शांतता का?" असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात असून,या भूमिकेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
#Support Sonam Sir.
#Support Abhijit Dipke.
#Need Better Education System.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
