Gadchandur : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL)अंतर्गत डीपीडीसी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या विविध ठिकाणांवरील २१ एअर ब्रेक(AB)स्विच बसविण्याच्या कामास तात्काळ सुरुवात करण्यात यावी,अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा,चंद्रपूर जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष रोहन रमेश काकडे यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव(दादा) भोंगळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार,बल्लारशाह ओ अँड एम विभागामार्फत सदर कामासाठी ₹५,४८,१४० इतक्या खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.EE/O&M/Dn/B'shah/T/Estt/DPDC (Gen)/2025-26/No.12 या आदेशानुसार कामास मंजुरी मिळालेली असतानाही प्रत्यक्षात अद्याप कामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
सदर २१ एबी स्विच बसविण्यात आल्यास वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल.तसेच वारंवार होणारे वीज खंडित होण्याचे प्रकार कमी होऊन नागरिकांना दर्जेदार,सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होईल,असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
मंजुरी मिळालेल्या या महत्त्वाच्या कामास कोणताही विलंब न लावता तातडीने प्रारंभ करून नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी रोहन रमेश काकडे यांनी संबंधित विभागामार्फत आमदार देवराव(दादा)भोंगळे यांच्याकडे केली आहे.
#Mahavitaran.#Gadchandur.#Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
