Chandrapur : महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ,चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हास्तरीय मेळावा व स्नेहसंमेलनाचे आयोजन रविवार,दि.१६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता 'एन.डी.हॉटेल,चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.या मेळाव्यात जिल्हाभरातील ग्रामीण पत्रकार,त्यांच्या कुटुंबीयांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकार तसेच पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण पत्रकारांना नव्या माध्यमांचे मार्गदर्शन मिळावे,त्यांच्या समस्या जाणून त्यावर चर्चा व्हावी तसेच पत्रकारांमध्ये सुसंवाद,एकोपा आणि संघटनात्मक बळकटी निर्माण व्हावी,या उद्देशाने या जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर(भाऊ)मुनगंटीवार राहणार आहेत.उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे उपस्थित राहतील.तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,नागपूर-अमरावती विभागाचे संचालक (माहिती)डॉ.गणेश मुळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.याशिवाय जिल्हाधिकारी वसुमना पंत,पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सचिव राजेश डांगटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन, जिल्हा कार्याध्यक्ष पी.एम.(कुक्कू)सहानी,जिल्हा महासचिव पुरुषोत्तम चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष अनिल शा.देठे,जिल्हा सचिव विनोद पन्नासे,कोषाध्यक्ष प्रकाश हांडे,मार्गदर्शक धर्मेश निकोसे, जिल्हा सहसचिव प्रभाकर आवारी,प्रसिद्धी प्रमुख धनराज कोठे तसेच जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी आणि सदस्य सांभाळत आहेत.
जिल्ह्यातील सर्व ग्रामीण पत्रकारांनी व पत्रकार बांधवांनी या जिल्हास्तरीय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा,असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ,चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
#Maharashtra Rajya Gramin Patrakar Sangh District Chandrapur. #Union of Journalists.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
