Chandrapur : महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाने जिल्हाभरातील ग्रामीण पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला असून,पत्रकारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाल्यास संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,असा ठाम विश्वास विदर्भ संघटक तथा जिल्हाध्यक्ष राजेश सोलापण यांनी व्यक्त केला.ते पोंभूर्णा येथे आयोजित महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुका कार्यकारिणी निवड कार्यक्रमात बोलत होते.यावेळी त्यांनी सांगितले की,पत्रकारांना वैयक्तिक अथवा व्यावसायिक कोणतीही अडचण निर्माण झाल्यास ती सोडविण्यासाठी संघटना सदैव तत्पर राहील.निर्भीड,नि:पक्ष आणि जबाबदार पत्रकारिता करत संघटित राहणे ही आजच्या काळाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी सर्वानुमते रुपेश निमसरकर यांची तालुकाध्यक्ष,विकास शेडमाके यांची उपाध्यक्ष,जीवनदास गेडाम यांची कार्याध्यक्ष, सुरेश कोमावार यांची सचिव,महेश श्रीगिरीवार यांची सहसचिव, सचिन मडावी यांची कोषाध्यक्ष तर किशोर मोहोरकर,अतुल भडके,राकेश मेश्राम,धनराज कोवे आणि दुर्योधन घोंगडे यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेला विदर्भ संघटक तथा जिल्हाध्यक्ष राजेश सोलापण,जिल्हा सचिव विनोद पन्नासे,मार्गदर्शक धर्मेश निकोसे, माजी निवासी जिल्हाधिकारी बडगेलवार,पत्रकार दुर्योधन घोंगडे तसेच तालुक्यातील अनेक ग्रामीण पत्रकार उपस्थित होते.
यावेळी जिल्हा सचिव विनोद पन्नासे,मार्गदर्शक धर्मेश निकोसे आणि माजी निवासी जिल्हाधिकारी बडगेलवार यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करत बदलत्या काळातील पत्रकारितेची आव्हाने, पत्रकारांचे अधिकार,कायदेशीर बाबी,व्यावसायिक नैतिकता आणि संघटितपणे कार्य करण्याचे महत्त्व यावर सविस्तर विचार मांडले.
उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पत्रकारांवरील वाढते हल्ले,खोटे गुन्हे,शासकीय कार्यालयांतील अडथळे तसेच ग्रामीण पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ सातत्याने कार्यरत राहील,असा विश्वास व्यक्त केला.
नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष रुपेश निमसरकर यांनी संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानले.तालुक्यातील सर्व ग्रामीण पत्रकारांना सोबत घेऊन संघटना अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी कार्य करणार असून पत्रकारांच्या सामाजिक,व्यावसायिक आणि कायदेशीर प्रश्नांच्या सोडवणुकीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल,अशी ग्वाही त्यांनी दिली.
#Maharashtra Rajya Gramin Patrakar Sangh District Chandrapur. #Union of Journalists.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
