Chandrapur :स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूरच्या पथकाने गोवंशीय जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने सुरू असलेली अमानुष वाहतूक उधळून लावत मोठी कारवाई केली.या प्रकरणात ७ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून टाटा-२०७ वाहनासह एकूण ₹६ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २१ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दुर्गापूर हद्दीतून पद्मापूर मार्गे रहमतनगर येथे गोवंशीय जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार मौजा पद्मापूर येथे नाकाबंदी करण्यात आली.
नाकाबंदीदरम्यान संशयित टाटा-२०७ वाहनाची तपासणी केली असता,त्यामध्ये ५ गाई व २ बैल अशी एकूण ७ गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंबून त्यांचा निर्दयपणे छळ करत कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी वाहनासह सर्व जनावरे ताब्यात घेत त्यांना सुरक्षिततेसाठी प्यार फाउंडेशन,चंद्रपूर येथे दाखल केले.
या प्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम,१९७६ मधील कलम ५(अ),९ व ११,प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम,१९६० मधील कलम ११(१)(घ),(ड),(च),(ज),भारतीय न्याय संहिता (BNS)कलम ३(५)तसेच मोटार वाहन अधिनियम कलम १७७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी :
१) फिरोज युसुफ कुरेशी (रा.दुर्गापूर).
२) शेख अश्फाक इमाम कुरेशी (रा.रहमतनगर).
३) सादिक याकुब कुरेशी (रा.रहमतनगर,ता.जि.चंद्रपूर).
जप्त मुद्देमाल :
७ गोवंशीय जनावरे (५ गाई,२ बैल) – ₹१,०५,०००
टाटा-२०७ वाहन – ₹५,००,०००
एकूण जप्त मुद्देमाल – ₹६,०५,०००
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी (मूल)सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर व उपविभाग मूल पोलीस पथकाने केली.
#Cattel Smuggling. #Action by LCB Chandrapur. #Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
