Gadchandur : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांच्या 22 जुलै रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसानिमित्त राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या आदेशानुसार गडचांदूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्थानिक स्व. भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी बैठक पार पडली.
बैठकीत शिबिराचे नियोजन,लाभार्थी नोंदणी,विविध आजारांची तपासणी,तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता,औषधांचे मोफत वाटप, स्वयंसेवकांच्या जबाबदाऱ्या तसेच नागरिकांना या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी व्यापक जनजागृती करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी कोरपना तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार,यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लाभार्थींना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.
सदर बैठकीस भारतीय जनता पार्टीचे तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार,भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,कोरपना तालुका अध्यक्ष संजय मुसळे,कोरपना महिला आघाडी अध्यक्षा सौ. स्मिता चिताळे,महिला शहराध्यक्षा सौ.शितल धोटे,विजयालक्ष्मी डोहे,सुंदरा दाळे,उमा कंटाळे,महेश घरोटे,विवेक भेडोलकर,मो. शाकीर भाई,रमेश चुदरी,जयंता भोंगळे,सुरेश मेश्राम,विनोद इंगळे,शंकर अपूरकर,जितेंद्र गानफाडे,पुरुषोत्तम भोंगळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच मेघे सावंगी ग्रामीण रुग्णालयाचे रुग्ण सेवा अधिकारी शिंगणे,ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच आशा वर्कर्स यांनीही बैठकीस उपस्थित राहून शिबिराच्या नियोजनात सहभाग नोंदविला.
#Health Camp Organized by BJP in Gadchandur. #Gadchsndur BJP News. #Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
