Gadchandur : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या संकल्पनेतून बुधवार,दि.२२ जुलै २०२६ रोजी गडचांदूर येथील स्व.भाऊराव चटप आश्रम शाळा येथे भव्य महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात विविध आजारांचे निदान,उपचार तसेच आवश्यक शस्त्रक्रिया पूर्णपणे निःशुल्क करण्यात येणार आहेत.नागरिकांनी या संधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजक भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आले आहे.
हे शिबिर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असून आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय,सावंगी(मेघे)येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे.यामध्ये मेडिसिन,नेत्ररोग, सर्वसाधारण शस्त्रक्रिया,बालरोग,स्त्रीरोग,कान-नाक-घसा (ईएनटी),अस्थिरोग,त्वचारोग,कर्करोग तसेच दंतचिकित्सा विभागातील तज्ज्ञांकडून तपासणी व आवश्यक चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत.
शिबिरासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी गडचांदूर येथील भाजप जनसंपर्क कार्यालय किंवा आपल्या परिसरातील भाजप पदाधिकाऱ्यांकडे नाव नोंदवावे.तसेच शिबिरास येताना आधार कार्ड आणि केशरी अथवा पिवळे रेशन कार्ड सोबत आणावे,असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.
#BJP Gadchandur.#Massive health and free surgery camp.#Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
