Chandrapur : आगामी सार्वजनिक गणेशोत्सव-2026च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला असून,पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेड येथे आढावा व नियोजन बैठक पार पडली.ही बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीला महानगरपालिका आयुक्त अकनूरी नरेश,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्यासह महानगरपालिका व विविध शासकीय विभागांचे अधिकारी,पोलीस अधिकारी-कर्मचारी,जिल्ह्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रतिनिधी,मूर्तिकार,डीजे चालक-मालक तसेच सुमारे 200 ते 250 नागरिक उपस्थित होते.बैठकीत गणेशोत्सव शांततापूर्ण,सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी विविध महत्त्वाच्या सूचनांसह नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
'बैठकीतील महत्त्वाचे निर्णय.'
•सर्व गणेश मंडळांनी समन्वय समिती स्थापन करून स्वयंसेवकांची नियुक्ती करावी.
•मंडप परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही (CCTV)व्यवस्था अनिवार्यपणे उभारावी.
•विसर्जन मिरवणुकीतील वाहनांवर लहान मुलांना बसवू नये, जेणेकरून अपघाताची शक्यता टाळता येईल.
•यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत सांस्कृतिक परंपरा जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
•प्रशासनातर्फे आयोजित 'आदर्श गणेश मंडळ स्पर्धेत' सर्व मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.
'डीजे' बंदीची प्रभावी अंमलबजावणी.'
बैठकीत सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात श्री गणेश चतुर्थीपासून 'डीजे' (DJ) वाजवण्यावर पूर्णपणे बंदी राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार व ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी या बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून,डीजे चालक-मालक तसेच गणेश मंडळांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
जिल्हा प्रशासन आणि चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने गणेश उत्सवासाठी आवश्यक सर्व तयारी सुरू केली असून,नागरिकांनी व सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून उत्सव शांततेत,सुरक्षिततेत आणि उत्साहात साजरा करावा,असे आवाहन करण्यात आले आहेत.
#Chandrapur District Ganesh Utsav 2026.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
