Gadchandur : येथील मेत्ताशा इण्डेन गॅस एजन्सी विरोधात नुकताच दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी नगरसेवक 'विक्रम येरणे' यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेली मागणी सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
'काय आहे मागणी?'
विक्रम येरणे यांनी शासनाकडे सदर गॅस एजन्सीचा परवाना रद्द करून तो स्थानिक अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिलेला देण्याची मागणी केली आहे. "गॅस एजन्सी गडचांदूरची आणि लाभार्थी नागपूरातील" हा प्रकार नेमका कशा परिस्थितीत घडला, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तसेच एजन्सी मंजुरीसाठी सादर करण्यात आलेल्या जुन्या कागदपत्रांचीही तपासणी करण्यात यावी.याचबरोबर येरणे यांनी एजन्सीतील कर्मचाऱ्यांच्या ग्राहकांप्रती असलेल्या वर्तनाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.अलीकडेच महसूल विभागाच्या चौकशीदरम्यान तहसील प्रशासनाचे कर्मचारी आणि पंचांसमोर घडलेल्या प्रकारामुळे,सामान्य ग्राहकांशी कशी वागणूक दिली जात असेल,याबाबत शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच इण्डेन गॅस कंपनीच्या अधिकृत तक्रार निवारण क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्राहकांनी आपल्या तक्रारी कुणाकडे मांडाव्यात,असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.यापूर्वीही उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांकडून आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या असल्याचा दावा करत,सदर एजन्सीचा परवाना रद्द करून दुसऱ्या पात्र व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यात यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.
माजी नगरसेवक विक्रम येरणे यांनी मांडलेल्या या मागण्यांवर संबंधित विभाग आणि प्रशासन कोणती भूमिका घेते,याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
#Demand. #Ex Nagarsevak Vikram yerne news.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
