Gadchandur : ग्राहकांची कथित फसवणूक,नियमांचे उल्लंघन तसेच गॅस वितरणातील अनियमिततेच्या प्रकरणात गडचांदूर येथील मेत्ताशा इण्डेन गॅस एजन्सीविरुद्ध अखेर संबंधित कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने या एजन्सीवर कारवाई केली होती.आता या प्रकरणात फौजदारी गुन्हा नोंद झाल्याने शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडण्यात पुढाकार घेणाऱ्या गडचांदूर नगरपरिषदेच्या विरोधी पक्षातील धडाकेबाज नगरसेविका सौ. शितल धोटे यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
'नेमकं प्रकरण काय?'
मिळालेल्या माहितीनुसार,गडचांदूर येथील मेत्ताशा इण्डेन गॅस एजन्सीकडून गॅस वितरणामध्ये कथित काळाबाजार,अवैध साठवणूक तसेच ग्राहकांची पिळवणूक होत असल्याची माहिती स्थानिक नागरिक आशिष रोकडे यांनी 6 एप्रिल 2026 रोजी नगरसेविका सौ.शितल धोटे यांना दिली.तक्रार मिळताच सौ.धोटे, यांनी तातडीने संबंधित गॅस एजन्सीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.त्यानंतर त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांना दूरध्वनीद्वारे सविस्तर माहिती दिली.आमदार भोंगळे यांनी तत्काळ तहसीलदार कोरपना आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधून प्रकरणाची गंभीरता निदर्शनास आणून दिली.
याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार संयुक्त निरीक्षण पथकाने प्रत्यक्ष स्थळाची तपासणी व पंचनामा केला.तपासणीदरम्यान एजन्सीकडून विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी आर.आर.बहादूरकर यांनी 4 जून 2026 रोजी तहसीलदार कोरपना यांना जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत संबंधित गॅस एजन्सीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार 10 जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.विशेष म्हणजे,एका सामान्य नागरिकाने केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेत नगरसेविका सौ.शितल धोटे यांनी दाखविलेली सक्रियता आणि धाडस याबद्दल शहरभरातून त्यांचे कौतुक होत आहे.
'काय म्हणाल्या सौ.शितल धोटे?'
"भारतीय जनता पक्ष नेहमीच सामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.गोरगरीब जनतेच्या हितासाठी आम्ही सातत्याने काम करत असतो.संबंधित गॅस एजन्सीकडून सुरू असलेला प्रकार अत्यंत गंभीर असून,एजन्सीचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा आणि नागरिकांसाठी पर्यायी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी मी शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले."
नगरसेविका सौ.शितल धोटे,या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या असून,त्यांच्या या भूमिकेमुळे गडचांदूर शहरात त्यांच्याविषयी सकारात्मक चर्चा सुरू आहे.दरम्यान,या प्रकरणात शासन आणि प्रशासन पुढे कोणती कारवाई करते,याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
#Mettasha Gas Agency Gadchandur News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
