Devabhau Seva Saptah : गडचांदूरात ‘देवाभाऊ सेवा सप्ताह’ अंतर्गत भव्य महाआरोग्य शिबिर; 2017 रुग्णांवर उपचार,365 मोफत शस्त्रक्रियेस पात्र.

News@BJP....

  Gadchandur : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त राजुरा विधानसभा मतदारसंघात आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित ‘देवाभाऊ सेवा सप्ताह’ अंतर्गत गडचांदूर येथील स्व.भाऊराव चटप आश्रम शाळेत भव्य महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात व सेवाभावाने पार पडले.भर पावसातही नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत तब्बल 2017 नागरिकांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला,तर तपासणीनंतर 356 रुग्ण मोफत शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले.तसेच 11 दिव्यांग बांधवांना ई-स्कुटरचे मोफत वितरण करण्यात आले.

      ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात सावंगी (मेघे)येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने हजारो रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार व वैद्यकीय मार्गदर्शन केले.तपासणीनंतर पात्र ठरलेल्या 356 रुग्णांवर टप्प्याटप्प्याने पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

   शिबिरात अत्याधुनिक कॅन्सर तपासणी व्हॅन,दंतचिकित्सा व्हॅन, नेत्रतपासणी,कर्करोग तपासणी तसेच गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले.याशिवाय अदाणी फाउंडेशनच्या सहकार्याने 11 दिव्यांग बांधवांना ई-स्कुटरचे वाटप करून त्यांच्या स्वावलंबनाला बळ देण्यात आले.

 यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत, त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामुळे लाखो गरजू रुग्णांना जीवनदान मिळाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे त्यांनी नमूद केले.

         एकाच छताखाली सर्वसमावेशक व आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.आमदार देवराव भोंगळे यांच्या सेवाभावी उपक्रमाचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनकल्याणकारी विचारांचे उपस्थितांनी कौतुक केले.या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, परिसरातील विविध उद्योगसमूहांचे वरिष्ठ अधिकारी,वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ,भाजप पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.भर पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

#Devabhau Seva Saptah. #BJP Gadchandur.#Massive health and free surgery camp.#Marathi News.

                      $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$