Gadchandur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेत शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांची दुसरी तुकडी सोमवारी मेघे सावंगी येथील रुग्णालयाकडे रवाना करण्यात आली.हिरवी झेंडी दाखवून आरोग्य रथाला निरोप देण्यात आला.
यापूर्वी २३ जुलै रोजी पहिल्या टप्प्यात ४२ रुग्णांना शस्त्रक्रिये करीता मेघे सावंगी येथे पाठविण्यात आले होते.त्यानंतर आज (२७ जूलै)रोजी दुसऱ्या टप्प्यात आणखी रुग्णांना उपचारासाठी रवाना करण्यात आले.महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने रुग्ण विविध शस्त्रक्रियांसाठी पात्र ठरले आहेत.या सर्व रुग्णांवर मेघे सावंगी येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून टप्प्याटप्प्याने मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
'लोकप्रतिनिधी असावा तर असा'
रुग्णांकडून आ.भोंगळेंचे कौतुक.
या उपक्रमामुळे लाभ मिळालेल्या रुग्णांनी आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.आमदार होण्यापूर्वीपासूनच गरजू,आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित रुग्णांच्या मदतीसाठी ते सातत्याने कार्यरत असून,आमदार झाल्यानंतर त्यांच्या आरोग्यसेवेच्या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळाल्याचे रुग्णांनी सांगितले.राजुरा विधानसभा मतदार संघातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना व्यक्त करत, "लोकप्रतिनिधी असावा तर असा" अशा शब्दांत रुग्णांनी त्यांचे आभार मानले.
दुसरी तुकडी रवाना करताना गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद (अरूण)डोहे,कोरपना तालुका भाजप संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार,तालुका महामंत्री महेश घरोटे,भाजप शहर उपाध्यक्ष मोहन भारती,भाजप युवा आघाडी शहराध्यक्ष विक्की उरकुडे,नगरसेवक सुरज पांडे,सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर,आनंद बेले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Devabhau Seva Saptah.#Mahaarogya camp.#BJP Gadchandur.#Massive health and free surgery camp.#Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
