Gadchandur : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी,चंद्रपूर (ग्रामीण)महिला मोर्चाच्या वतीने २२ जुलै रोजी गडचांदूर येथील स्व.भाऊराव पाटील आश्रमशाळेत ‘देवाभाऊ कृषी माऊली’ सोहळा उत्साहात पार पडला.कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना शेती उपयोगी कृषी किटचे वितरण करण्यात आले,तसेच शासनाच्या विविध कृषी व महिला सक्षमीकरण योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव दादा भोंगळे होते.प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी अधिकारी गोविंद ठाकूर,कार्यक्रमाच्या संयोजिका तथा भाजपा प्रदेश महामंत्री कु.अल्का आत्राम,भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,जिल्हा महामंत्री विवेक बोढे, कोमल फरकाळे,भाजपा महिला कोरपना तालुकाध्यक्षा सौ. स्मिताताई चिताळे,तालुकाध्यक्ष संजय मुसळे,कोरपना तालुका संघटन महामंत्री सतीश उपलेचवार,गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,शहर महामंत्री हरीश घोरे,नगरसेवक तथा गटनेते सतीश बेतावार,महामंत्री महेश घरोटे,भाजपा महिला शहराध्यक्षा तथा नगरसेविका शितल धोटे,शहर महामंत्री उमा कंटाळे, नगरसेवक हिमांशू नामवाड,नगरसेवक सुरज पांडे,नगरसेविका सौ.कीर्ती वैरागडे,नगरसेविका सौ.संगीता गाऊत्रे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत पावसाळी अधिवेशनात महिलांना शेतकरी दर्जा देणारे विधेयक मंजूर झाल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन केले.त्यानंतर महिला शेतकऱ्यांना कृषी किटचे वाटप करण्यात आले.
कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांनी माती परीक्षणाचे महत्त्व,मृदा आरोग्य तपासणीचे फायदे आणि आधुनिक शेतीतील त्याची उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले.तर भाजपा प्रदेश महामंत्री कु.अल्का आत्राम यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिला बचत गटांशी जोडावे,आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि शेतीपूरक उद्योग सुरू करून आर्थिक स्वावलंबन साधावे,असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात आमदार देवराव दादा भोंगळे यांनी राज्य शासनाच्या कृषी,महिला व शेतकरी कल्याणकारी योजनांची माहिती देत महिलांनी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे,असे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन सौ.शितल धोटे यांनी केले,तर सौ.स्मिताताई चिताळे यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमास महिला शेतकरी,भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी,युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
#'Devabhau Krishi Mauli' Ceremony. #Gadchandur. #Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
