Chandrapur : जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगार दिलशान काजी सादिक काजी उर्फ धीरज मोहन दयाल (वय 30) याला गावठी पिस्तूल,5 जिवंत काडतुसे आणि मोबाईलसह अटक केली आहे.ही कारवाई रेल्वे स्टेशनजवळील मुन्ना कॅन्टीन परिसर,जलनगर वार्ड येथे करण्यात आली.
'घटनेचा तपशील.'
दिनांक 10 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी रामनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, एका विश्वासार्ह मुखबिरामार्फत माहिती मिळाली की,जलनगर वार्डातील मुन्ना कॅन्टीनजवळ एक व्यक्ती अवैध शस्त्र बाळगून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करीत आहे.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली.संशयिताची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेले एक गावठी लोखंडी पिस्तूल तसेच पॅन्टच्या मागील खिशातून पाच जिवंत काडतुसे आढळून आली.त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
'अटक आरोपी.'
नाव : दिलशान काजी सादिक काजी उर्फ धीरज मोहन दयाल वय 30 वर्षे,रा.सपना टॉकीजजवळ,जलनगर वार्ड चंद्रपूर.
'जप्त मुद्देमाल.'
एक गावठी लोखंडी पिस्तूल – किंमत ₹ 25,000
पाच जिवंत काडतुसे – किंमत ₹ 2,500
विवो कंपनीचा मोबाईल – किंमत ₹ 10,000
एकूण जप्त मुद्देमाल : ₹ 37,500
'गुन्हा दाखल.'
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्र.908/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा (Arms Act)कलम 3 व 25 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून,पुढील तपासासाठी आरोपीला रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
'कारवाई पथक.'
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि. योगेश हिवसे,पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.सुनील गौरकार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
#Chandrapur #LCB #PoliceAction #BreakingNews #ArmsAct #CrimeNews
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
