Chandrapur : शहर महानगरपालिकेतील AIMIM चे नगरसेवक अजहर शेख यांच्यावर रविवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली.या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून वातावरण चांगलेच तापले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,अजहर शेख,हे त्यांच्या मालकीच्या 'अरेबियन ताज' बिर्याणी हॉटेलमध्ये उपस्थित असताना अचानक १० ते १५ युवक तेथे आले.या युवकांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अजहर शेख यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान,रुग्णालयात उपचार सुरू असताना अजहर शेख यांनी माध्यमांशी संवाद साधत गंभीर आरोप केले आहेत.ते एकोरी प्रभागाचे AIMIM चे नगरसेवक असून,त्याच प्रभागातील काँग्रेस नगरसेविकेचे पती,त्यांचे नातेवाईक तसेच काँग्रेसचे पराभूत उमेदवार,यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींची भूमिका तपासली जात आहे.या घटनेमुळे चंद्रपूर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून,पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#Crimr News Chandrapur.#Chandrapur Azhar Sheikh Attack Case.#Marathi News.
©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©
