Crime News : चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई; 51 गुन्ह्यांतील तब्बल ₹66.14,886चा.अमली पदार्थ नष्ट!| Marathi News.

News@Chandrapur Police...

   Chandrapur : जिल्ह्यात अमली पदार्थांविरुद्ध सुरू असलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 51 गुन्ह्यांतील एकूण ₹66,14,886 किमतीचे जप्त अमली पदार्थ नियमानुसार नष्ट केले.ही कारवाई 10 जुलै 2026 रोजी जिल्हा न्यायालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच जिल्हास्तरीय अमली पदार्थ नाश समिती यांच्या परवानगीनंतर करण्यात आली.

नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये 310 किलो 340 ग्रॅम गांजा (किंमत ₹ 53,02,486),420 ग्रॅम एमडी (पावडर) (किंमत ₹ 13,05,000)आणि 76 ग्रॅम गर्द (किंमत ₹ 7,400)यांचा समावेश होता.एकूण ₹ 66,14,886 किमतीचा जप्त मुद्देमाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शासकीय वाहनातून नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड येथे सुरक्षितरीत्या नेण्यात आला.तेथे अत्याधुनिक बॉयलर प्रणालीद्वारे पर्यावरणपूरक पद्धतीने सर्व अमली पदार्थांची पूर्णतः विल्हेवाट लावण्यात आली.

  सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि प्रभारी गृह उपअधीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्यासह सफौ.अरूण खारकर,पोहवा. सुधीर मत्ते,पोकॉ.किशोर वकाटे,पोकॉ.प्रदीप मडावी,पोकॉ. अमोल साबे,फोटोग्राफर पोकॉ.वैभव पत्तीवार,चापोहवा.प्रमोद डोंगरे,पोकॉ.रूपेश बारशिंगे आणि पोकॉ.शुभम बल्की यांनी सहभाग घेतला.

चंद्रपूर पोलीसांकडून अमली पदार्थांच्या अवैध तस्करी व विक्री विरोधात सातत्याने कठोर कारवाई सुरू असून,समाजाला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी अशा प्रभावी उपाययोजना भविष्यातही कायम राहतील,असा निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

#Chandrapur District Crime News. #Marathi News #Chandrapur News.

                                $$$$$$$$$$$$$$$$$$$$$