Chhatrapati Shivaji Maharaj Maharajaswa Samadhan Shibir : कोरपन्यात यशस्वी; एकाच छताखाली नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ!|Marathi News.

News@Maharaj Maharajaswa Abhiyan...

Korpana  : 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' हे महाराष्ट्रातील महसूल विभागामार्फत राबवले जाणारे एक लोकभिमुख आणि गतिमान प्रशासकीय उपक्रम आहे.याद्वारे सर्वसामान्य जनता,शेतकरी,विद्यार्थी व महिलांच्या महसूल व शासकीय सेवेशी संबंधित तक्रारींचे मंडळ स्तरावर एकाच छताखाली निराकरण केले जाते.याच पार्श्वभूमीवर शुक्रवार (२४ जूलै)रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत विशेष महसूल शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजना तसेच आवश्यक दाखल्यांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात,या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभर 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला आहे.त्याअंतर्गत जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना येथे आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ.अशोक उईके म्हणाले की,महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून शासनाच्या विविध योजना एकाच छताखाली (Single Day Service Delivery)नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य या विभागामार्फत होत आहे.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाला नवी दिशा दिली असून,राज्य सरकार सर्वसामान्य आणि गरिबांच्या हितासाठी सातत्याने काम करत आहे.शेतकरी हिताच्या विविध योजना,वीजबिल सवलत तसेच जिवतीसारख्या दुर्गम भागातील प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

या शिबिरात नागरिकांच्या समस्या जागीच सोडविण्यावर भर देण्यात आला.जातीचा दाखला,उत्पन्न प्रमाणपत्र,सातबारा उतारा यांसह विविध शासकीय दाखले व सेवांचा लाभ नागरिकांना त्वरित उपलब्ध करून देण्यात आला.शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवून प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व गतिमान करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी वसुमना पंत,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर,उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, बालाजी कदम,नायब तहसीलदार करिष्मा वासेकर,समाज कल्याण अधिकारी भागवत रेजीवाड,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कटारे,गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे,जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता किशोर मटाले,कोरपना न.प.नगराध्यक्षा नंदा बावने,भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे,तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार,गडचांदूर शहराध्यक्ष अरविंद (अरुण) डोहे,भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे, तालुकाध्यक्षा स्मिता चिताडे,नगरसेवक किशोर बावणे,गीता डोहे, सविता तुमराम,वर्षा लांडगे,कोरपना शहराध्यक्ष अमोल आसेकर, महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे,अरुण रागीट,आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी,ओम पवार,भाजयुमो तालुकाध्यक्ष दिनेश खडसे,अविनाश वाभीटकर,प्रमोद कोडापे,जगदीश पिंपळशेंडे,रवी बंडीवार,कार्तिक गोंलावार,पवन बुरेवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Maharajaswa Samadhan Shibir in Korpana.

                         ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢