Chandrapur Voter List Suspension case : मतदार यादीतील हलगर्जीपणा महागात; चंद्रपुरात दोन शिक्षक,तीन कर्मचारी निलंबित!| Marathi News.

News@Voter List Suspension Case...

Chandpur : मतदार यादीची तयारी व पुनरावलोकनाच्या कामात गंभीर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत चंद्रपूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी 2 शिक्षक 3 कर्मचारी असे 5 जणांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

       निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये मुरलीधर बागला हायस्कूल, चंद्रपूर येथील सहायक शिक्षक आर.बी.येसांबरे,चंद्रपूर महानगर पालिका शाळेतील सहायक शिक्षक आनंद गेडाम तसेच वेकोली क्षेत्रीय मुख्यालयातील कर्मचारी सोनू ढुमणे,किरण रामटेके आणि मनोज शेंडे यांचा समावेश आहे.

 जिल्हाधिकारी यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम,1950 मधील कलम 13(AA)तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील)नियम 1979 मधील नियम 4(1)अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून ही कारवाई केली.मतदार यादीशी संबंधित अधिकृत निवडणूक कर्तव्य पार पाडताना झालेल्या गंभीर निष्काळजीपणाच्या पार्श्वभूमीवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

   दरम्यान,महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तन)नियम,1979 मधील नियम 16 नुसार निलंबनाच्या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांना कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गैरवर्तनाची कारवाई करण्यात येईल.तसेच अशा परिस्थितीत त्यांना निर्वाह भत्त्याचाही लाभ मिळणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

#Voter List.#Suspension.#Chandrapur.#Marathi News.

              ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢