Chandrapur : जिल्ह्यातील महिला,तरुणी आणि बालकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाने दामिनी पथकाला विशेष ‘पिंक वाहन’(Pink Vehicle)उपलब्ध करून दिले आहे.पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या वाहनाचा शुभारंभ करण्यात आला.
महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध घालणे,छेडछाडीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत महिलांना तातडीने मदत उपलब्ध करून देणे,हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.नव्याने उपलब्ध झालेल्या पिंक वाहनामुळे दामिनी पथकाची कार्यक्षमता आणि प्रतिसादाची गती अधिक वाढणार असून महिला सुरक्षा व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.
‘पिंक वाहन’ची प्रमुख वैशिष्ट्ये :
तात्काळ प्रतिसाद(Quick Response) : मदतीची माहिती मिळताच दामिनी पथक घटनास्थळी त्वरित पोहोचणार.
नियमित गस्त : शाळा,महाविद्यालये,बसस्थानके,रेल्वे स्थानके, मुख्य बाजारपेठा तसेच निर्जन भागात नियमित गस्त घालून महिलांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष ठेवले जाणार.
विशेष ओळख : गुलाबी-जांभळ्या रंगातील ‘दामिनी मोबाईल’ लोगोयुक्त वाहनामुळे नागरिकांना ते सहज ओळखता येईल आणि समाजकंटकांवरही प्रतिबंधात्मक धाक निर्माण होईल.
महिला पोलीस कर्मचारी : वाहनात प्रशिक्षित महिला पोलीस अंमलदार तैनात राहणार असल्याने पीडित महिलांना आपली तक्रार निर्भयपणे मांडणे अधिक सुलभ होणार आहे.
पोलीस अधीक्षकांचे आवाहन :
यावेळी पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, “महिला व मुलींची सुरक्षितता ही चंद्रपूर पोलीस दलाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. दामिनी पथकाला मिळालेल्या या नवीन पिंक वाहनामुळे पथकाची गतिशीलता आणि प्रतिसाद क्षमता अधिक प्रभावी होईल.कोणत्याही प्रकारची छेडछाड,त्रास किंवा आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास महिलांनी न घाबरता तात्काळ पोलीस हेल्पलाइन किंवा दामिनी पथकाशी संपर्क साधावा.”
दामिनी पथक,चंद्रपूर हेल्पलाइन : 744 1098 122.
#Chandrapur Police. #Pink Vehicle. #Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
