Chandrapur : शहरातील बसस्थानक परिसरातील एका कार्यालयातून ₹ 6 लाखांची रोख रक्कम चोरी झाल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)मोठी कारवाई करत छत्तीसगड राज्यातून एका आरोपीला अटक केली आहे.त्याच्याकडून चोरीतील ₹ 3 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी फिर्यादी सौ.राकेश अवघडे (वय 44)रा.डी.एस.के.ग्रीन कॉलनी,दाताळा,चंद्रपूर यांनी बसस्थानकाजवळ पॅलेस हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या त्यांच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्याने ₹ 6 लाखांची रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.त्यानुसार रामनगर पोलिसांनी अप.क्र. 956/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS)2023 च्या कलम 331(4)अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.
या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे हाती घेतला.तपासादरम्यान वलेश कुमार हल्बा उर्फ बुवारिया (वय 38) रा.रेंगाकठेरा,पोस्ट डोंगरगाव,जि.राजनांदगाव (छत्तीसगड)याचा शोध घेऊन त्याला छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली.त्याच्या कबुलीजबाबावरून पंचांसमक्ष आरोपीच्या ताब्यातून चोरीतील ₹ 3 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.आरोपीने 27 जुलै रोजी चंद्रपूर बसस्थानक परिसरातील एका कार्यालयातून ₹ 6 लाखांची रोकड चोरी केल्याची कबुली दिली असून,उर्वरित ₹ 3 लाखांचा शोध पोलीस घेत आहेत.सदर आरोपीला पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि.योगेश हिवसे, पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.सुनील गौरकर,पोहवा.सतीश आवठारे,पोहवा. इम्रान खान,पोहवा.लालू यादव, पोहवा.संदीप,पोहवा.हिरालाल गुप्ता,पोअं.किशोर वाकडे आणि पोअं.शशांक बदाम यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
#Chandrapur Crime News. #Action by LCB Chandrapur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
