Chandrapur : जिल्ह्यातील पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी खुटाळा परिसरात घडलेल्या तब्बल ₹२१.१४ लाखांच्या गॅस सिलिंडर चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश करत मोठे यश मिळविले आहे.या प्रकरणात तीन आरोपी निष्पन्न करण्यात आले असून, चोरीतील बहुतांश मुद्देमालासह ₹२.४७ लाखांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
चोरीची घटना :
फिर्यादी वैभव विनोद खांडरे (वय ४२,रा.समाधी वॉर्ड,जेल रोड चंद्रपूर),हे गॅस सिलिंडर वाहतूक व्यवसाय करतात.दि.१२ जुलै २०२६ रोजी एमआयडीसी खुटाळा येथील गॅस बॉटलिंग प्लांट समोरील रस्त्यावर उभा असलेला अशोक लेलंड कंपनीचा ट्रक (क्र.MH/34/BG/1600)अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला होता. यामध्ये ३३२ घरगुती गॅस सिलिंडर,१० कमर्शियल सिलिंडर असून,ट्रकसह एकूण चोरीचा मुद्देमाल ₹२१.१४ लाखांचा होता. याप्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासातून आरोपी निष्पन्न :
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा (LCB)व पडोली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यातील तीन आरोपी निष्पन्न केले.
आरोपींची नावे :
१) राजेंद्र रामचंद्र काळे(वय ३२,रा.वांढरी फाटा,पडोली,चंद्रपूर).
२) कुणाल सुभाष घुरुडे(वय २७,रा.म्हाडा कॉलनी,दातळा चंद्रपूर).
३) मोहित पोतदार(रा.मुलचेरा,जि.गडचिरोली).
मोठा मुद्देमाल जप्त :
आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी चोरीतील बहुतांश मुद्देमाल तसेच सिलिंडर विक्रीतून मिळालेली रोकड जप्त केली.
जप्त मुद्देमाल :
१४.२ किलोचे HP कंपनीचे गॅसने भरलेले घरगुती सिलिंडर ८२ नग.
१४.२ किलोचे रिकामे घरगुती HP सिलिंडर २५० नग.
१९ किलोचे HP कंपनीचे गॅसने भरलेले कमर्शियल सिलिंडर १० नग.व सिलिंडर विक्रीतून जमा झालेली ₹२,४७,००० रोकड
पोलिसांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि.योगेश,सपोनि.दीपक कंकरेद्वार, पोउनि.विनोद भुरले,पोउनि.सुनील गौरकार,पोउनि.देवानंद केकान (पडोली पोलीस स्टेशन),पोहवा.सुभाष गोहोकार, सतीश अवथरे,रजनिकांत पुठ्ठावार,दीपक डोंगरे,इमान खान,शरद कुडे, पोअं.हिरालाल गुप्ता,संदीप कांबडी,किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार यांनी यशस्वीरीत्या केली आहे.
#Chandrapur Crime News. #Acyion by LCB Chandrapur. #Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
