Chandrapur : बल्लारपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत चोरीस गेलेली बजाज पल्सर 220 मोटारसायकल जप्त केली आहे.या प्रकरणी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाची चौकशी करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे ₹50,000 किंमतीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,त्यांनी आपली बजाज पल्सर कंपनीची मोटारसायकल दि.20जुलै 2026 रोजी बॅटरी बदलण्यासाठी एका गॅरेजवर दिली होती.त्यानंतर वाहन परत आणण्यासाठी गेल्यावर मोटारसायकल मिळून आली नाही. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान,दि.27 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की,चोरीस गेलेली बजाज पल्सर 220 मोटारसायकल विक्रीसाठी एका व्यक्तीकडून प्रयत्न सुरू आहेत.या माहितीच्या आधारे बल्लारपूर येथील दूध डेअरी परिसरात सापळा रचण्यात आला.कारवाईदरम्यान एका विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आणि संबंधित गुन्हा उघडकीस आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या पथकात सपोनि.बलराम झाडोकार,पोउपनि. सर्वेश बेलसरे,पोहवा.सुभाष गोहोकार,पोहवा.सचिन गुरनुले, पोहवा.रजनीकांत पुट्टावार,पोअं.प्रतीक हमके,पोअं.विठ्ठल काकडे पोअं.प्रफुल्ल पुप्पुलवार आणि पोअं.दिनेश अराडे यांनी सहभाग घेतला.
#Chandrapur Crime News.#Two-wheeler thief.#Action by LCB.#Marathi News.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
