Chandrapur Crime : 18.95 ग्रॅम एमडी ड्रग्जसह सराईत आरोपी जेरबंद,₹1.44 लाखांचा मुद्देमाल जप्त!| Marathi News.

News@Mephedrone ड्रग्ज...

  Chandpur : शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा(LCB)ने अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत एमडी (Mephedrone)ड्रग्जची अवैध विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला रंगेहात अटक केली.या कारवाईत पोलिसांनी १८.९५ ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर आणि मोबाईलसह एकूण ₹१,४४, ७५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दिनांक २८ जूलै २०२६ रोजी रात्री LCB चे पथक रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत मा शहिती मिळाली की,ललित उर्फ आर्यन बादल कंजर (वय ३८,रा.कंजर मोहल्ला,जलनगर वॉर्ड चंद्रपूर)यांनी त्याच्या जुन्या घरात विक्रीच्या उद्देशाने MD ड्रग्जचा साठा करून ठेवला आहे.

   माहितीची खात्री झाल्यानंतर स्थानिक LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी विशेष पथकाची स्थापना केली.एनडीपीएस कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांची परवानगी घेऊन पंच,फोटोग्राफर व शासकीय वजन काटेवाल्यासह संशयिताच्या घरावर छापा टाकण्यात आला.

     कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संशयिताची व घराची झडती घेतली असता,१८.९५ ग्रॅम एमडी(Mephedrone)ड्रग्ज पावडर (अंदाजे किंमत ₹९४,७५०)तसेच एक मोबाईल(अंदाजे किंमत ₹५०,०००),असा एकूण ₹१,४४,७५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम,१९८५(NDPS Act)अंतर्गत कलम ८(क),२२(ब)व २९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपीला रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि.योगेश हिवसे,सपोनि.दीपक कांकडवार,पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि. सुनील गौरकर,सर्वेश बेलसरे,पोहवा.सतीश, इम्रान,लालू,संदीप, हिरालाल तसेच पोअं.किशोर,शशांक आणि मपोअं.छाया यांनी केली आहे.

#Chandrapur Crime News. #Mephedrone Dergs.#Action by LCB.

                                   $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

Advertisement....