Celebrated birthdays by planting trees : "वाढदिवसाचा हरित संकल्प;" अरविंद कोरे यांचा १५ वर्षांचा वृक्षसंवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम!|Marathi News.

News@Planting Trees..

   Gadchandur : वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाला पर्यावरण संरक्षणाचा सकारात्मक संदेश देण्याची संधी आहे,या विचाराला कृतीची जोड देत गडचांदूर येथील भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष अरविंद कोरे यांनी यंदाही वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा केला. गेल्या तब्बल 15 वर्षांपासून वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्याची परंपरा त्यांनी अखंडपणे जपली असून त्यांच्या या हरित उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

"एक वृक्ष – आरोग्यदायी भविष्य" या संकल्पनेला अनुसरून प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत वाढदिवस,विवाहदिन किंवा इतर आनंदाच्या क्षणी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.वाढते प्रदूषण,बदलते हवामान आणि घटणारे हरित क्षेत्र लक्षात घेता वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.याच दिवशी भाजपा शहर उपाध्यक्ष बबलू रासेकर आणि कार्यकर्ते गणपत बुरडकर यांचाही वाढदिवस असल्याने तिघांनी मिळून समाज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.उपस्थित मित्रपरिवाराने पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अरविंद कोरे यांनी वर्षानुवर्षे लावलेल्या वृक्षांपैकी एक वडाचे रोपटे आज भव्य वृक्षात रूपांतरित झाले असून परिसर हिरवागार झाला आहे.वडसावित्रीच्या दिवशी अनेक महिला या वृक्षाजवळ येऊन पूजा-अर्चना करतात.त्यामुळे केवळ वृक्ष लावणे नव्हे,तर त्याचे संवर्धन करणेच खऱ्या अर्थाने पर्यावरण संरक्षण आहे,याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. "फोटोसेशनसाठी अनेक झाडे लावण्यापेक्षा दोन झाडे लावून ती जगविणे अधिक महत्त्वाचे आहे," असा पर्यावरणपूरक संदेश यावेळी देण्यात आला.याप्रसंगी कोरपना तालुका भाजपा अध्यक्ष संजय मुसळे, गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,नगरसेवक सुरज पांडे, नगरसेवक हिमांशू नामवाड,भाजपा कार्यकर्ते देवराव विधाते, जयंता भोंगळे,अमोल आसेकर,महेश घरोटे,रमेश चुदरी,योगेश बांदुरकर,विवेक भेडोलकर,विनोद इंगळे,विश्वासजी,अंजली विश्वास,जयश्री शेंडे, जिवणेताई,अमित कोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

                                'पर्यावरण प्रेमींची प्रतिक्रिया.' 

वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपण करणे हा एक उत्तम आणि पर्यावरणाला पूरक पर्याय आहे.वाढदिवशी लावलेले झाड तुमच्या आयुष्यासोबत वाढते आणि निसर्गाला शुद्ध ऑक्सिजन व निवारा प्रदान करते.हे निस्वार्थ प्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक मानले जाते.अशी पर्यावरणपूरक प्रतिक्रिया उपस्थित पर्यावरण प्रेमींनी दिली आहेत.

#Celebrated birthdays by planting trees. #planting trees. #Gadchsndur News. #Korpana News.

                           $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$