Bridge construction case : गडचांदूर न.प.च्या पुलिया बांधकामावर प्रश्नचिन्ह.40 दिवस उलटले तरी माहिती नाही!|Marathi News.

News@Bridge construction case...

Gadchandur : नगर परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जिवती मार्गावरील बंडू शेरकी,यांच्या घरासमोरील पुलिया बांधकामासाठी परवानगी मागितली होती.त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने दि.17 एप्रिल 2026 रोजी काही अटी व शर्तींसह बांधकामास परवानगी दिली होती.मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन करून नगर परिषदेने नगर परिषदेचा ठराव,तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी तसेच कार्यादेशाशिवाय निकृष्ट दर्जाचे पुलिया बांधकाम केल्याचा गंभीर आरोप गडचांदूर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनी केला आहे.या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर,यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल करून संपूर्ण चौकशी तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहेत.

याशिवाय,दि.25 मे 2026 आणि दि.3 जुलै 2026 रोजी गडचांदूर सार्वजनिक बांधकाम विभागालाही लेखी तक्रार देत,त्यांच्या मालकीच्या रस्त्यावर करण्यात आलेल्या पुलिया बांधकामासाठी नगर परिषदेने आवश्यक मंजुऱ्या घेतल्या आहेत का? याबाबतची माहिती मागविण्यात आली होती.मात्र,40 दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही नगर परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणतीही माहिती अथवा कागदपत्रे सादर केली नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर दि.6 जुलै 2026 रोजी नगर परिषदेला स्मरणपत्र पाठवून आवश्यक माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

आता या स्मरणपत्रानंतर तरी नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाला अपेक्षित माहिती उपलब्ध करून देणार का,की पुन्हा टाळाटाळ करणार,याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.तसेच, माहिती न दिल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग पुढे कोणती प्रशासकीय अथवा कायदेशीर कारवाई करणार,याबाबतही परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.

#Gadchandur N.P.

#Bridge Construction Case.

#BJP City President Arvind Dohe.

#Public Works Department Gadchandur.

                  $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$