Action by FDA : 'येथे' अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; २०,५०० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू व पानमसाला जप्त!|Marathi News.

News@Crime...

Chandrapur : जिल्ह्यातील भद्रावती येथे अन्न व औषध प्रशासन (FDA),चंद्रपूर यांनी धडक कारवाई करत राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू,पानमसाला व सुपारीचा मोठा साठा जप्त केला.भद्रावती बसस्थानक परिसरातील "बाबू कोल्ड्रिंक्स, पान मसाला अँड कन्फेक्शनरी" या दुकानावर ही कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान दुकान चालक अतुल सुरेश कोल्हे (वय ४०)यांच्या ताब्यातून विविध प्रकारचा खुला सुगंधित तंबाखू,पानमसाला आणि सुपारी असा सुमारे ३३ किलो प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मालाची अंदाजे किंमत २० हजार ५०० रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

    तपासादरम्यान राज्य शासनाने विक्री,साठवणूक व वितरणास बंदी घातलेल्या अन्नपदार्थांचा साठा आढळून आल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.याप्रकरणी आरोपी तसेच संबंधित वाहन मालकाविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १२३,२२३,२७४ व २७५ अन्वये गुन्हा क्रमांक ०६४९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

       सदरची कारवाई नागपूर विभागाचे सहआयुक्त (अन्न)के.आर. जयपूरकर तसेच चंद्रपूरचे सहाय्यक आयुक्त (अन्न)प्रवीण उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.अन्न सुरक्षा अधिकारी उमेश एम.कापगते यांच्या नेतृत्वात पी.डी.कांबळे आणि के.जी.मुले यांनी यशस्वीरीत्या अंमलात आणली.

            प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री,साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

#FDA Action.#Action by FDA in Chandrapur District.

     ‌‌              ‌‌ ‌    $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$