Gadchandur : समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपत गडचांदूर पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवार(दि.१८ जुलै) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांसह रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिरात एकूण २१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले असून,त्यामध्ये ७ पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता.पोलिसांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.यावेळी गडचांदूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक(API)गोदे पाटील तसेच कोरपना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक(PI)लता वाढवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी,असे आवाहन केले.रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते.त्यामुळे नागरिकांनी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वेच्छेने रक्तदान करावे,असेही त्यांनी सांगितले
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गडचांदूर पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.रक्तदाते, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मान्यवरांनी आभार मानले.रक्तदानासारख्या समाजहिताच्या उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास,सामाजिक बांधिलकी आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
🩸"रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या संदेशाला प्रत्यक्ष कृतीतून बळ देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आणि गडचांदूर पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#Gadchandur #Police #BloodDonation #SocialService #Chandrapur #Korapna #Maharashtra.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
