Chandrapur-Korpana : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने कोरपणा शहरातील पक्ष संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दि.27 जुलै रोजी भारतीय जनता पार्टी सेवा केंद्र,कोरपणा येथे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या उपस्थितीत उमेश पालीवार यांची कोरपणा शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.यावेळी पक्षाच्या वतीने त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
उमेश पालीवार हे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय,निष्ठावान व जनसंपर्क असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.पक्ष संघटना अधिक मजबूत करणे,जनसामान्यांच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत राहतील,असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उमेश पालीवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उमेश पालीवार यांनी पक्ष नेतृत्वाने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत,पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि कोरपणा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
#BJP korpana.#Chandrapur.#Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$


