Pollution is a big problem : राजुरा विधानसभेतील कोळसा खाणी, सिमेंट उद्योग व कोल वॉशरीमुळे वाढते वायू व धूळ प्रदूषण; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!|Marathi News.

News@Serious Problem...

    Maharashtra  Monsoon Session 2026 Mumbai : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे सुरू असून,शेतकरी कर्ज माफीसह विविध जनहिताच्या प्रश्नांवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर २५ जून रोजी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव(दादा)भोंगळे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या नियम १०५ अंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्रातील वाढत्या धूळ व वायू प्रदूषणाचा गंभीर प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला.

              'प्रदूषणामुळे शेती व आरोग्य धोक्यात' भोंगळे.

  सभागृहात बोलताना आमदार भोंगळे यांनी सांगितले की,चंद्रपूर जिल्ह्यासह राजुरा मतदारसंघात वेकोलि कोळसा खाणी,सिमेंट उद्योग आणि कोल वॉशरी मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत.या उद्योगांमुळे परिसरात धूळ व वायू प्रदूषणाची तीव्र समस्या निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम शेती,पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

        ते म्हणाले, "आमचा उद्योगांना विरोध नाही.उद्योगांचे आम्ही स्वागतच करतो.मात्र,विकासासोबत नागरिकांचे आरोग्य आणि शेतकऱ्यांचे हितही तितकेच महत्त्वाचे आहे.प्रदूषणामुळे शेत जमिनींची सुपीकता कमी होत आहे,उत्पादन घटत आहे आणि नागरिक विविध आजारांना बळी पडत आहेत.त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे."

      आमदार भोंगळे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजुरा दौऱ्याचाही उल्लेख करत,प्रत्यक्ष पाहणी करूनही अनेक ठिकाणी प्रदूषणाची परिस्थिती अद्याप कायम असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

                            'काय म्हणाल्या मंत्री पंकजा मुंडे?'

        आमदार भोंगळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्य शासनाकडून आवश्यक धोरणात्मक निर्णय घेतले जातील,तसेच महसूल व उद्योग विभागांच्या समन्वयातून प्रदूषण नियंत्रणासाठी अधिक प्रभावी नियमावली तयार करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे सभागृहात आश्वासन दिले.

#Maharashtra Monsoon Session 2026.#The problem of pollution is serious.#Pollution is a big problem.

         ‌                     $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$