Shocking News : माहेरी आलेल्या महिलेची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या!| Marathi News.

News@Crime...

Rajura : येथील वेकोलि(WCL)च्या धोपटाळा कामगार वसाहती मध्ये एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शीतल रणधीर कुंभारे वयवर्ष 35,असे मृत महिलेचे नाव असून, 28 मे च्या मध्यरात्री ते 29 मे च्या सकाळी,अंदाजे 11 ते 12 च्या दरम्यान सदर घटना घडली असावी,असे अंदाज बांधले जात आहे.या हत्याकांडामुळे चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

             मिळालेल्या माहितीनुसार,शीतल ह्या मूळच्या चंद्रपूरातील महाकाली कॉलरी,कपील चौक,येथील रहिवासी असून,त्या काही दिवसांपूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये धोपटाळा टाऊनशिप मधील क्वॉर्टर नं.52/2 येथे आपल्या माहेरी आल्या होत्या. घटनेच्या वेळी घरात शीतल आणि त्यांची 12 वर्षीय मुलगी निरीक्षा,या दोघीच होत्या.शीतलचे भाऊ आणि आई देवदर्शना साठी बाहेरगावी गेले होते.याचा फायदा घेत अज्ञात आरोपीने मध्यरात्री घरात अनधिकृतरित्या प्रवेश करून शीतलवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला.अत्यंत क्रूरपणे गळा चिरून त्याची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला.जाताना आरोपीने मृत महिलेचा मोबाईल फोनही सोबत नेल्याची माहिती आहे. दरम्यान शुक्रवारी(29 मे रोजी)सकाळी मुलगी झोपेतून उठल्या नंतर तिला आई दिसली नाही.घरात शोध घेतला असता,एका खोलीत शीतल रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या.शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली.हा थरारक चित्र पाहून संपूर्ण परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

   सदर घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसिफराजा शेख यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.मृत महिलेचे पती रणधीर कुंभारे,यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी संबंधित कलमान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून,या संवेदनशील आणि गंभीर प्रकरणाचा तपास आता LCB कडे सुपूर्द करण्यात आल्याचे कळते.आरोपीचा शोध सुरू असून लवकरच आरोपीला अटक होईल,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

#Murder Case Rajura.#Shocking News.

                                    $$$$$$$$$$$$$$$$$$$$