Gadchandur : शिवसेना (UBT)गटाचे राजुरा विधानसभा प्रमुख तथा माजी नगरसेवक सागर ठाकूवार,यांनी पद व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.ऐन विधानपरिषद निवडणूकीच्या तोंडावर ठाकूरवार यांच्या राजीनाम्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्याकडे राजीनामा दिला असून पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,सचिव विनायक राऊत,चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम,चंद्रपूर वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघ तथा आमदार वणी विधानसभा,यांनाही राजीनाम्याची प्रत पाठवण्यात आली आहे.
सदर राजीनाम्या बद्दल विचारले असता,'आपल्या वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला असून पक्षाने मला संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.सध्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नसल्याचे त्यांनी म्हटले आहेत.' सागर ठाकूरवार यांनी पक्ष बांधणीसाठी मोठी मेहनत घेतली.ग्रामपंचायत सदस्य व नगर परिषदेचे गटनेते तथा नगरसेवक राहीले आहेत.विधानसभेत पक्ष वाढीत ठाकूरवार यांचा मोलाचा वाटा असून विधानसभेत मोठा जनसंपर्क आहे.सागर ठाकूरवार नंतर आता कोण? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
#Shiv Sena(UBT)News
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
