Samosa,Vadapav,New Rules(FSSAI) : रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते,हॉटेल्स,रेस्टॉरंट्स आणि केटरर्स यांनी अन्नपदार्थ न्यूज पेपरमध्ये किंवा छापील कागदामध्ये देणे टाळावे, असा कडक इशारा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI)ने दिला आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह थेट जेलवारी सुद्धा होऊ शकते.वडापाव,समोसा, भजी,चाट,भेळ,ब्रेड पकोडा,यांसारखे गरम व तेलकट पदार्थ अनेकदा न्यूज पेपरमध्ये दिले जातात.मात्र,ही पद्धत आरोग्यास धोकादायक असल्याचे FSSAI ने स्पष्ट केले आहे.
तज्ज्ञांच्या मते,वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये विविध रसायने व जड धातूंचे अंश असतात.गरम किंवा तेलकट पदार्थांचा संपर्क आल्यास ही रसायने अन्नामध्ये मिसळू शकतात.अशा अन्नाचे सेवन केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढतो.FSSAI ने रेस्टॉरंट मालक, रस्त्यावरील खाद्य विक्रेते,किरकोळ दुकानदार आणि केटरर्स यांना अन्नपदार्थांसाठी फूड-ग्रेड पॅकेजिंग साहित्याचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.अन्न सुरक्षा आणि मानके विनियम, 2018 नुसार न्यूज पेपर किंवा इतर छापील कागदामध्ये अन्न देणे प्रतिबंधित आहे.Samosa,Vadapav,New Rules.
अलीकडेच मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यावर या संदर्भात कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विक्रेते तसेच ग्राहकांनीही अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे FSSAI ने म्हटले आहे.नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते.त्यामुळे अन्नपदार्थ खरेदी करताना ते स्वच्छ व सुरक्षित पॅकेजिंगमध्येच दिले जात आहेत का,याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#Big warning from FSSAI.#Samosa,Vadapav,New Rules.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
