Gadchandur Nagarparishad : ती निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात!| Marathi News.

News@निविदा....

       Gadchandur : येथील नगरपरिषदेत मनुष्यळ पुरवठा निविदा प्रक्रियेतील गंभीर त्रुटींकडे लक्ष देऊन तात्काळ कारवाई करण्याची विनंती वजा मागणी विरोधी पक्ष नगरसेविका शीतल धोटे यांनी नगरपरिषद नगराध्यक्ष निलेश ताजने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.नगरसेविका धोटे,यांनी दिलेल्या निवेदना नुसार,मुख्याधिकाऱ्यांनी कर विभाग(Tax Department)मार्फत 12 मार्च 2026 रोजी ऑफलाईन निविदा मागवल्या होत्या.त्या निविदेवर अंतिम निर्णय न होता,15 मे 2026 रोजी पुन्हा ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या.यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे ऑफलाईन निविदा धारकांना नगर परिषदेकडून कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही.जर ते निविदा धारक न्यायालयात गेल्यास सदर निविदेवर स्थगिती येऊ शकते व त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्येक्ष शहराच्या विकासावर पडू शकतो,असा इशारा नगरसेविका धोटे यांनी म्हटले आहे.

     आपण शहराचे प्रथम नागरिक व नगरपरिषदेचे प्रमुख आहात. शहराच्या हिताचे सर्व निर्णय आपल्या मार्गदर्शनाखाली व्हावेत. यासाठी आपण स्वतः याकडे लक्ष देऊन मुख्याधिकारी,यांना सदर निविदा प्रक्रियेबाबत विचारणा करून योग्य निर्णय घेण्यासाठी अवगत करावे,तसेच झालेल्या निर्णयाची माहिती मला कळवावी, असेही नगरसेविका धोटे यांनी निवेदनात नमूद केले आहे. नगरपरिषदतर्फे सुरू असलेल्या काही कामांच्या श्रेणीत,सदरची निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून येत आहे. आता यावर नगराध्यक्ष काय निर्णय घेतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#Gadchandur Nagarparishad.

                                $$$$$$$$$$$$$$$$$$$$