MP Sanjay Dina Patil : पत्रकारांना शिवीगाळ व मारहाणीची धमकी”; खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा विविध पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध!Marathi News.

News@निषेध...

   MP Sanjay Dina Patil : राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘ऑपरेशन टायगर’नंतर विविध राजकीय घडामोडींना वेग आला असताना,ईशान्य मुंबईचे खासदार Sanjay Dina Patil यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांशी बोलताना त्यांनी कथितपणे अर्वाच्य भाषा वापरत शिवीगाळ केली तसेच मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून,त्यामध्ये खासदारांनी पत्रकारांबाबत संताप व्यक्त करत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे.तसेच, “पुन्हा येथे आलात तर मारून पाठवेन” अशा स्वरूपाची धमकीही त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दिल्याचा आरोप समोर आला आहे.

या घटनेनंतर राज्यभरातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली असून,पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.लोकशाहीतील चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर अशा प्रकारचे दबाव किंवा धमक्या अस्वीकार्य असल्याची भूमिका विविध संघटनांनी व्यक्त केली आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ कोरपना तालुका,यांच्या वतीनेही खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित वर्तनाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.पत्रकारांशी सन्मानपूर्वक वर्तन करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून, धमकी आणि दडपशाहीच्या माध्यमातून पत्रकारांचे कामकाज रोखण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारा असल्याचे म्हटले जात आहे.

पत्रकार संघटनांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांकडून स्पष्टीकरण व योग्य कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान,व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे राज्यातील राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.

#MP Sanjay Dina Patil.

                   $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$