Gadchandur Nagarparishad : 'येथे' नेमकं चाललंय तरी काय?| Marathi News.

News@Shocking...

           Korpana : तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषद सध्या नाना कारणांनी सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.'येथे नेमकं चाललंय तरी काय? असे एक ना अनेक प्रश्न जनतेसमोर उभे ठाकले आहे. शहरातील त्या पुलाचे बांधकाम नियमबाह्य असल्याचे आरोप करत विरोधी पक्ष नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणाचे सर्व पुरावे नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना देत चक्क नगराध्यक्ष आणि संबंधीत अभियंतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.या मागणीमुळे एकच खळबळ माजली असताना पुन्हा दुसरे प्रकरण पुढे आले आहे.यामध्येही पुर्वीचीच मागणी विरोधी पक्षाच्या 2 नगरसेवकांनी न.प.मुख्याधिकारी, यांच्याकडे केली आहे.सदर प्रकरणाची वास्तविकता जाणून घेण्यासाठी या नगरसेवकांनी 46 डिग्री तापमानाच्या रणरणत्या उन्हात सदर ठिकाणी जाऊन ऑन स्पॉट पंचनामा केला,हे मात्र विशेष.यावेळी भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,जयंता भोंगळे यांची उपस्थिती होती. 

                                  'आता हे प्रकरण काय?' 

   दिलेल्या निवेदनानुसार सविस्तर असे की,गडचांदूर नगर परिषद हद्दीतील स.नं.212/1,या जागेवर शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून ठेवण्यासाठी टीनचे शेड(डॉग शेल्टर)ची उभारणी करण्यात आली.मात्र,तो शेड बेकादेशीर बांधून नगराध्यक्ष निलेश ताजने,यांनी स्वमर्जीने व हितसंबंधातून शासकीय निधीचा अपहार करण्याचा कट रचल्याचे गंभीर आरोप विरोधी नगरसेवक सुरज पांडे व हिमांशु नामवाड यांनी केला आहे.नगरसेवक सुरज पांडे यांनी माहितीचा अधिकार(RTI)च्या माध्यमातून सदर धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत.अंदाजे 2500 चौ.फूट शेडच्या उभारणीसाठी 'ठराव निरंक,तांत्रिक मंजुरी निरंक, प्रशासकीय मंजुरी निरंक,कार्यादेश निरंक व ई-निविदा प्रक्रिया निरंक असल्याचे मिळालेल्या माहितीवरून उघड झाले आहे.

“कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता,नगराध्यक्षांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत,कलम 44 चा भंग करून,स्वतःच्या निकटवर्तीय ठेकेदाराला मर्जीने काम देऊन,ते पूर्ण करून घेतले. सध्याच्या परिसरातीत त्याचे बिल अदा झाले नसले तरी,काम पुर्ण करून घेणे,हा निधी अपहाराचा पूर्वनियोजित गुन्हेगारी कट आहे.” असा थेट आरोप नगरसेवक सुरज पांडे यांनी केले आहे.

सदर प्रकरणी नगरसेवक सुरज पांडे,हिमांशु नामवाड व गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,यांनी मुख्याधिकारी,यांना लेखी तक्रार देऊन नगराध्यक्ष निलेश ताजने,संबंधित ठेकेदार व जबाबदार बांधकाम अभियंतावर IPC चे कलम 120B,511,409 व म.न.प.अधिनियम कलम 44 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

                 'भाजप शहराध्यक्ष डोहे यांचा कडक इशारा.' 

       "मुख्याधिकारी म्हणून मालमत्तेचे रक्षणकर्ते असताना,त्यांच्या परवानगी शिवाय न.प.च्या जागेवर इतका मोठा नियमबाह्य काम होणे गंभीर बाब आहे.जर सदर कामाचे बिल मंजूर केल्यास मुख्याधिकारी स्वतः सहआरोपी ठरतील," नगर परिषदेची निधी, ही जनतेचा पैसा आहे.ती योग्य व नियमानुसार खर्च न करता नियमबाह्य काम आपल्या हितचिंतकाला देवून निधीचा अपहार करण्याचा कट रचत असेल तर,हे आम्ही खपवून घेणार नाही. पदाचा दुरोपयोग करून जर अशाप्रकारे कामे होत असेल तर, त्यांच्या विरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्याचा कडक इशारा भाजप शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनी दिला आहे.आता मुख्याधिकारी याप्रकरणी काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.काही का असेना मात्र,विरोधी पक्षाचे 'काही' नगरसेवक आपली विरोधकांची भुमिका योग्यरित्या पार पाडत असल्याची चर्चा ऐकायला मिळत असून पुन्हा कोणकोणते प्रकरण समोर येतात ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

#Gadchandur Nagarparishad Case.

                                  $$$$$$$$$$$$$$$$$$$