Morwa POCSO Case : मोरवा येथील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी विधानसभेत आ.सुधीर मुनगंटीवार आक्रमक; दोषीला कठोर शिक्षेची मागणी!| Marathi News.

News@POCSO...

           Chandrapur : शहरालगतच्या मोरवा गावातील वसाहतीत अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर घटनेचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले.या प्रकरणी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले.या घटनेचा जलद,निष्पक्ष आणि प्रभावी तपास करून आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी,अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात केली. Morwa POCSO Case.

आ.मुनगंटीवार यांनी सांगितले की,या प्रकरणात पडोली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाढत्या बाल लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून,कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पीडित बालिकेला तातडीने तज्ज्ञांकडून आवश्यक वैद्यकीय उपचार,मानसोपचार आणि समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.तसेच या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून दोषीला कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी शासनाने आवश्यक ती सर्व पावले उचलावीत,अशी मागणीही त्यांनी केली.Morwa POCSO Case.

याशिवाय भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढविणे,शाळा व परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणे,बालसुरक्षेबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले.

बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने अधिक कठोर आणि परिणामकारक प्रतिबंधात्मक धोरण स्वीकारून अशा अमानुष कृत्यांविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घ्यावी,अशी मागणीही त्यांनी विधानसभेत केली.

#Chandrapur Crime.#Morwa child abuse case.#MLA Sudhir Mungantiwar.#Morwa POCSO Case.

                          $$$$$$$$$$$$$$$$$$$$$