Chandrapur : जिल्ह्यातील कोरपना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा (LCB)ने यशस्वी छडा लावला असून,आरोपीला अटक करून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.दि.30 जून 2026 रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कोरपना परिसरात सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याच्याकडून पोलीस स्टेशन कोरपना येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात चोरीस गेलेली बजाज पल्सर 125 मोटारसायकल(किंमत अंदाजे ₹ 40 हजार)जप्त करण्यात आली. आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी कोरपना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस स्टेशन कोरपना येथे अपराध क्रमांक 266/2026 अंतर्गत कलम 303(2),भारतीय न्याय संहिता(BNS)अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश राजू दर्शनवार(वय 26 वर्षे,रा.कोरपना,ता.कोरपना, जि.चंद्रपूर),असे आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच गडचांदूर परिक्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात LCB पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
#Chandrapur District Crime News.#Action by LCB Chandrapur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
