Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB),यांनी अवैधरित्या मध्यप्रदेशातून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत 5 लाख 15 हजार 858 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे.
दिनांक 30 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन वरोरा हद्दीतील मौजा नंदोरी टी-पॉइंट येथे सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकण्यात आला.याप्रकरणी पोलीस स्टेशन वरोरा येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम 65(ई)(अ) व 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल :
29 पेट्यांमधील (353 नग,750 मिली)विदेशी दारूच्या बाटल्या,किंमत ₹ 1,83,858
दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली Toyota Etios GD (क्र.MH-01-BT-1087),किंमत ₹ 3,00,000
तीन मोबाईल फोन,किंमत ₹ 30,000
असा एकूण ₹ 5,15,858 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक आरोपी :
नरेंद्र जितेंद्र भाट (वय 31),रा.जलनगर,चंद्रपूर
सौ.दामिनी भाट,रा.जलनगर,चंद्रपूर
फरार आरोपी :
सुर्या उर्फ सूरज परसंगे,रा.जलनगर,चंद्रपूर.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूरच्या वरोरा उपविभागीय पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून पुढील तपास पोलीस स्टेशन वरोरा करीत आहे.
#Crime News.#Illegal transportation of alcohol Case.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
