Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)च्या पथकाने वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत 70 हजार रुपये किमतीची चोरीची मोपेड जप्त केली आहे.या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी गिरड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दिनांक 27 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की,वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली मोपेड(क्रमांक MH/34/CS/4482),ही तळोधी(ता.नागभीड,जि. चंद्रपूर),येथे असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने तातडीने कारवाई करून संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीकडून 70 हजार रुपये किमतीची मोपेड जप्त करण्यात आली.त्यानंतर आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी गिरड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला.या प्रकरणी गिरड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 0158/2026 अंतर्गत कलम 303(2),भारतीय न्याय संहिता (BNS)अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे.
आरोपी :
सुशांत राजेंद्र मडावी(वय 26 वर्षे)रा.तळोधी,ता.नागभीड जि. चंद्रपूर.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी उपविभागीय पथकाने केली आहे.
#Chandrapur police.#Crime News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
