Chandrapur Police : हरविलेले 7 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश; मूळ मालकांना मिळाला दिलासा!| Marathi News.

News@Crime...

Chandrapur : जिल्ह्यातील पोलीस स्टेशन माजरी, ता.भद्रावती जि.चंद्रपूर यांच्या कार्यक्षेत्रात सन 2025-26 दरम्यान हरविलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी CEIR(Central Equipment Identity Register)Portal च्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेदरम्यान चंद्रपूरसह मध्यप्रदेशातून एकूण 7 हरविलेले मोबाईल फोन शोधून काढण्यात आले. शोधण्यात आलेले सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना पोलीस स्टेशन माजरी,येथे सुरक्षितपणे परत करण्यात आले. माजरी पोलिसांच्या तत्पर आणि सकारात्मक कार्यवाहीबद्दल सर्व मोबाईलधारकांनी पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानले.

                               'मोबाईल प्राप्त झालेले नागरिक.'

1) प्रफुल चवरे,रा.वालधर्डी(Vivo Y28).

2) राहुल टलांडे,रा.पळसगाव (Vivo Y90).

3) दीपक कुमार निराला,रा.कुचना (Realme RMX3998).

4) ज्ञानचंद बहादूर,रा.कॅट कॉलरी (Vivo T3X).

5) सजेंद्र खऱ्यात,रा.कुचना (Xiaomi Mi 11 Lite)

6) प्रकाश केवट,रा.माजरी कॉलरी (Redmi).

7) राम शर्मा,रा.कॅट कॉलरी (Realme RMX3242).

सदर 7 मोबाईल फोनची प्रत्येकी अंदाजे किंमत 15 हजार रुपये असून,एकूण 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला.

ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस स्टेशन माजरीचे ठाणेदार सपोनि.सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.

                                     'जनतेसाठी आवाहन'

गर्दीच्या ठिकाणी,आठवडी बाजारात किंवा बसस्थानक परिसरात मोबाईल फोन शर्टच्या वरच्या खिशात ठेवणे टाळावे. मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी,त्याच क्रमांकाचे नवीन सिमकार्ड घ्यावे आणि दूरसंचार विभागाच्या CEIR Portal वर त्वरित तक्रार नोंदवावी,असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

#Chandrapur District Police.#Crime News.

                            $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$