Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)यांनी अमलीपदार्थां विरोधात मोठी कारवाई करत 104.210 ग्रॅम एम.डी. (Mephedrone)ड्रग्ज जप्त केले असून,या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी ड्रग्ज,2 मोबाईल फोन आणि रोख रक्कम,असा एकूण ₹ 6 लाख,23 हजार,370 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जटपूरा गेट परिसरातील इटनकर पान मंदिराजवळ एम.डी.अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली आहे.
कारवाईदरम्यान ओम संतोष इटनकर(वय 25,रा.जटपुरा वॉर्ड, चंद्रपूर),याला ताब्यात घेऊन त्याची तसेच राहत्या घराची झडती घेण्यात आली.झडतीत 104,210 ग्रॅम एमडी(मेफेड्रोन),2 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ₹ 6.23 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत ओम इटनकर,याने हा अमली पदार्थ इरफान उर्फ भुऱ्या पठाण(रा.बागलखिडकी चंद्रपूर),याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली.त्यानंतर तांत्रिक व इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी इरफान पठाण यालाही ताब्यात घेऊन अटक केली.याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS Act,1985 अंतर्गत कलम 8(c),22(c) व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा,आर्थिक व्यवहार तसेच इतर संबंधित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
'अटक आरोपी' :
ओम संतोष इटनकर(25),रा.जटपुरा वॉर्ड,चंद्रपूर.
इरफान उर्फ भुऱ्या पठाण,रा.बागळखिडकी चंद्रपूर.
'जप्त मुद्देमाल' :
104.210 ग्रॅम एमडी(मेफेड्रोन)अमली पदार्थ.2 मोबाईल फोन,
'रोख रक्कम एकूण किंमत :
₹ 6,23,370.
'कारवाई करणारे पथक' :
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि.विनोद भुरले,सुनील गौरकार,संतोष निंभोरकर,डोके,यांच्यासह LCB चे अधिकारी-कर्मचारी आणि श्वान पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
#Chandrapur District Crime News.#Action by LCB Chandrapur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
