Chandrapur : जिल्ह्यातील राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी वाहन चोरी विरोधात मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून,त्यांच्या ताब्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे तसेच तेलंगणा राज्यातील वांकडी पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीच्या 7 दुचाकी जप्त केल्या आहेत.जप्त वाहनांची एकूण किंमत ₹ 2.63 लाख इतकी आहे.
राजुरा पोलीस ठाण्यात 25 जून 2026 रोजी म्रित्युंजय आशुतोष बिश्वास वय 55 रा.भिवापूर वॉर्ड चंद्रपूर,यांनी तक्रार दाखल केली होती.22 जून रोजी दुपारी अंदाजे 12.30 ते 2 वाजण्याच्या दरम्यान राजुरा तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभी केलेली त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस क्रं.MH/34/Y/1461 ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले.यावरून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.572/2026 अन्वये कलम 303(2),3(5)भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 2 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली.त्यांच्या ताब्यातून चोरीच्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
अटक आरोपी :
1) साहील वसंता टेकाम वयवर्ष 20 रा.इंदिरानगर चुनाळा ता. राजुरा जिल्हा चंद्रपूर.
2) चेतन दिनेश मिलमिले वयवर्ष 21रा.इंदिरानगर चुनाळा ता. राजुरा जिल्हा चंद्रपूर.
जप्त मुद्देमाल :
आरोपींकडून हिरो होंडा स्प्लेंडर,स्प्लेंडर प्लस व स्प्लेंडर प्रो,या मॉडेलच्या एकूण 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या.या वाहनांची एकूण अंदाजित किंमत ₹ 2 लाख 63 हजार असून,संबंधित चोरीचे गुन्हे राजुरा,रामनगर,कोरपना तसेच तेलंगणातील वांकडी पोलीस स्टेशन येथे नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन :
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार राजुरा,यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर,यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या कारवाईत सपोनि.लक्ष्मण लोकरे,सफौ.किशोर तुमराम,पोहवा.विक्की निर्वाण,पोहवा.अनुप डांगे,पो.अं.महेश बोलगोडवार,शफीक शेख, मिलिंद जांभुळे,रमेश बस्सी,शरद राठोड आणि राजीव दुबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
#Chandrapur District Crime News.#Bike thieves arrested.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
