Gadchandur : गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक 'शिवाजी कदम' यांना 1 मे रोजी(महाराष्ट्र दिन)जिल्हा पोलीस मुख्यालय येथे जिल्ह्याचे पालकमंत्री वुईके,यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचे "पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने" सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या सारख्या निष्ठावान अधिकाऱ्यांमुळे आज संपूर्ण पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली असून आपल्या या अतुलनीय कामगिरीचा चंद्रपूर पोलीस दलास सार्थ अभिमान असल्याचे मत व्यक्त होत आहे.
पोलीस निरीक्षक कदम यांनी प्रामाणिक,कर्तव्यदक्ष आणि शिस्तबद्ध कार्यशैलीतून शहरातील कायदा व सुव्यवस्था उत्तम ठेवत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.ते आपल्या संपूर्ण टीमला सोबत घेऊन गडचांदूरात उल्लेखनीय कामगिरी बजावत असल्याचे चित्र असून त्यांच्या या कार्याची दखल घेत,त्यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात आले आहे.हा कर्तव्यदक्षाचा गौरव असून गडचांदूरसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.सन्मानित झाल्याबद्दल 'कोरपना Live' च्या वतीने साहेबांचे मन:पुर्वक अभिनंदन.भविष्याती पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
#Honored with a Medal.#Police Inspector Shivaji Kadam Awarded by 'Director General of Police' Medal🏅 ...
🔹🎉🔹🎉🔹🎉🔹🎉🔹🎉🔹🎉🔹
