Gadchandur : गेल्या कित्येक वर्षांपासून आपण मोठ्या भक्ती भावाने या दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेत असून 'कौमी एकते'चे प्रतीक असलेल्या या दर्ग्यामध्ये दुरदुरून भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात.अनेकांच्या भावना या दर्ग्याशी जुळलेली आहे. याठिकाणी सर्वधर्मसमभाव जोपासले जाते,ही बाब उल्लेखनीय व अभिमानास्पद असून या परिसराच्या विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार.या तीर्थक्षेत्राला 'क' दर्जातून 'ब' दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणार.हे गाव आणि या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे मत राजुरा विधानसभेचे विकासपुरुष,धडाकेबाज आमदर देवराव(दादा) भोंगळे यांनी व्यक्त केले.ते कोरपना तालुक्यातील 'कुसळ शरीफ' येथे “हजरत अ.रहेमान दूल्हेशाहवली बाबा(र.अ.)” यांच्या वार्षिक उर्स यात्रे निमित्त दर्गा कमिटीतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी मंचावर उर्स कमिटीचे अध्यक्ष सैय्यद आबिद अली, कोरपना पोस्ट.चे ठाणेदार लता वाढिवे,कोरपना न.प.चे उपाध्यक्ष इस्माईल शेख,भाजपा तालुकाध्यक्ष संजय मुसळे,गडचांदुर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,आशिष ताजणे,नगरसेवक महेश आवारी,अबरार अली,इस्माईल ढाकवाला,निसार शेख,मोहम्मद शेख,राजीक खान,प्रमोद कोडापे,तिरुपती किन्नाके,नगराध्यक्ष निलेश ताजणे यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्तींची प्रमुखांने उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्यात शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना तालुक्यातील गाव 'कुसळ' येथे हजरत दुल्हेशाहवली बाबा(र.अ.) यांचा तीन दिवसीय उर्स यात्रा(मेला)भरतो.यवतमाळ,वर्धा,चंद्रपूर जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा राज्यातून अनेक हिंदू-मुस्लिम भाविक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी याठिकाणी येत असतात.या निमित्ताने दुय्यम कव्वालीचा सामना सुद्धा आयोजित केला जातो.याचा आनंद घेण्यासाठी व बाबाच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने नागरिकांनी याठिकाणी आपली हजेरी लावत असतात.दरवर्षी प्रणाणे यंदाही उर्स यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान आमदार देवरावदादा भोंगळे यांनी बाबाच्या दर्ग्याचे दर्शन घेऊन चादर चढवून प्रार्थना केली.दर्गा कमिटी अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी आ.भोंगळे यांचा सत्कार केला.तसेच मंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले.आ.भोंगळे यांच्या आगमनानंतर अनेक मुस्लिम बांधवांनी त्यांची गळाभेट,हस्तांदोलन करून प्रसन्नता व्यक्त केली. सैय्यद सुहेल यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.यात्रे दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोरपना ठाणेदारांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याचे पहायला मिळाले.
#URS Festival.#MLA Devrav Bhangle.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
