Chandrapur : जिल्ह्यातील भांदक रेल्वे स्टेशन परिसरातील विद्युत खांबास एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.सदर घटना आज 14 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास रेल्वे गेट क्र.36 जवळील विद्युत वाहिनी पोल क्र.852 B/34 AI,येथे घडली.दुर्गेश प्रसाद मसराम वयवर्ष 18,असे तरुणाचे नाव असून तो मूळचा ग्राम कोको, तहसील बिछिया,जिल्हा मंडला(MP)येथील रहिवासी होता.तो आपल्या आई,वडिलांसोबत येथे मजुरीचे कामासाठी आला होता ही आत्महत्या की घातपात? मृत्युचे कारण अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
सध्या वर्धा–बल्लारशाह रेल्वे लाईन व सायडिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.मध्यप्रदेश व इतर राज्यांतील अनेक मजुर याठिकाणी हंगामी रोजगारासाठी आले आहे.ते रेल्वे परिसरात सहकुटुंब झोपड्यांमध्ये वास्तव्यास आहे.आज पहाटे दुर्गेश घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला असता तो रेल्वे लाईनजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.मात्र,ही घटना मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्याने पुढील तपास रेल्वे सुरक्षा बल(RPF)करत आहे.
#18-year-old youth commits suicide by hanging himself in Bhandak railway area.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
