Gadchandur : शाळा,महाविद्यालय किंवा विद्यापीठातील जुने विद्यार्थी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देतात,मित्र-मैत्रिणींना भेटतात आणि शिक्षकांचा आदर,सन्मान करतात. ज्यामध्ये आनंद,उत्साह आणि भावनिक क्षण असतात,जे भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आणि मैत्री व आठवणींना उजाळा देतो.याच पार्श्वभूमीवर गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयातील 2003-4 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी 8 फेब्रुवारी रोजी स्नेहमेळावा(Get-together) आयोजित करण्यात आला.यासाठी शेख यूनूस आणि मोहम्मद इमरान(गुड्डू),यांनी पुढाकार घेतला.वास्तविक पाहता 22-23 वर्ष जुन्या शाळेतील मित्र-मैत्रिणींना शोधून काढणे व जोडणे खूप अवघड गोष्ट होती.तरीपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे योग जुळून आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद,उत्साह उफाळून आला होता.
यावेळी उपस्थित सर्वांनी एकामेकांच्या हल्लीच्या जीवनातील घडामोडींवर सविस्तर चर्चा करत शालेय जीवनाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.इतके वर्षानंतर आपण सर्व जण एकत्र आल्याने खरंच मन भारावून गेले.जुने ते दिवस,त्या आठवणी ताज्या झाल्या,आपल्याला सगळ्या शिक्षकांनी खूप प्रतिसाद दिला.अशी भावना यावेळी व्यक्त होत होती.अनेक मित्र-मैत्रिणी बोलून न दाखवता त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव सगळे काही बोलून जात होते.आपल्या आयुष्यातील अनुभव सांगून जात होते. आयुष्यात आमच्या नशिबी असा क्षण येईल,याचा विचार सुद्धा केला नव्हता! अशी हृदयस्पर्शी भावना यावेळी व्यक्त होताना दिसून आली.
सदर स्नेहमेळाव्याला चौधरी सर,बावनकर सर,पुंजेकर मॅडम यांचे नेतृत्व लाभले.मोहम्मद इमरान(गुड्डू),शेख युनूस,इस्तियाज कीडिया,अतुल टोंगे,निर्मेश पटेल,सतीश खोब्रागडे,सुनील,प्रशांत विकास,मंगेश,वाजित,सचिन,विक्की,मुकिंदा,संदीप,मनोज,राजू,जवादे,अनिल डहाके,शुभांगी,योगिता,सुप्रिया,शीतल,माधुरी या जुन्या विद्यार्थ्यांनी आवर्जून हजेरी लाऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला.
#Alumni get-together in Gadchandur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
