Crime : बांधकामाचे सिमेंट,लोहा चोरणाऱ्याला बेड्या!|Marathi News.

News@Crime...

    Chandrapur : जिल्ह्यातील मुल तालुक्यातील मौजा नांदगाव येथे आरोपी श्रिकांत कामीडवार यांनी स्थानिक ISP कंपनीच्या मालक व फिर्यादीला कोणतीही पुर्वसुचना न देता त्यांच्या गोडाऊन मध्ये ठेवलेले बांधकामाचा लोहा व सिमेंट मालापैकी 70 बंडल 10 MM स्टीलचे 700 बार किं.अं.2 लाख,67 हजार 853 रू.50 सिमेंट बॅग,असा एकूण 2 लाख,82 हजार,853 रूपयेचा माल चोरी केला.फिर्यादीच्या तक्रारीवरून मुल पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू करण्यात आला.मुल पोलीसांनी सदर प्रकरणाची त्वरीत दखल घेत तपास करून 6 तासात आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर,ट्राली,असा एकूण 7 लाख,82 हजार,853 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मुलचे SDPO सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात पोनि.विजय राठोड यांच्या नेतृत्वात सपोनि. सबोध वंजारी,पोहवा.भोजराज मुंडरे,पोहवा.इंदल राठोड,पोहव सुनिल कुळमेथे,पोअं.गणेश मेश्राम,पोअं.संदिप चुधरी,पोअं.नरेश कोडापे,पोअं.वेदनाथ करंबे,पोअं.संदिप चुधरी,पोअं.शंकर बोरसरे,पोअं.दिलीप आदे यांनी केली आहे.

#Chandrapur District Crime News.

                            $$$$$$$$$$$$$$$$$$$$$