Kidnapping Case : अपहरण झालेल्या 3 वर्षीय मुलाचा 20 तासाच्या आत शोध!|Marathi News.

News@खळबळजनक...

     Chandrapur : जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे 28 फेब्रुवारी रोजी 'एका 27 वर्षीय महिलेने तक्रार दिली की,ती आणि तिचा पती बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरात राहत असून परिसरातील गोळा केलेला कचरा विकून आपली उपजीविका चालवितात.दरम्यान 27 फेब्रुवारी रोजी रात्री परिवारासह बल्लारपूर रेल्वे स्टेशन समोरील खुल्या पटांगणावर झोपून असताना कुणीतरी अज्ञात इसमाने तिच्या 3 वर्षीय मुलाचा अपहरण केले.'अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू करण्यात आली.

        सदर घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि बल्लारपूर पोलिसांची 7 वेगवेगळी पथके गठीत केली.100 पेक्षा जास्त CCTV फुटेजची तपासणी करून मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे व एका स्थानीक सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी निष्पन्न करून तेलंगणा राज्यातील मंचेरियाल येथे पथके रवाना करण्यात आली.

      सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी ऐलक्का रायसिंग बुद्धे वयवर्ष 60,राणी विनोदकुमार पसनोटी वयवर्ष 30,संगिता व्यंकटेश पानंगणती वयवर्ष  40,सर्व राहणार मंचेरियल(तेलंगणा राज्य)व यांच्यासोबत इतर 2 पुरुष बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथे आले व सदर मुलावर पाळत ठेवली आणि आईवडील झोपले असतांना मुलाचे अपहरण करून एका चार चाकी वाहनाद्वारे विक्रीसाठी घेऊन गेले.सातक्का चंद्रया करेरे वयवर्ष 50 व लावण्य कुमारस्वामी कोणा वयवर्ष 34 रा.मंथनी,मंचेरियल जिल्हा मंचेरियल(तेलंगणा राज्य)यांना 3 लाख,50 हजारात विकले होते. मंचेरियाल पोलिसांच्या मदतीने सदर 5 ही आरोपी महिलांना अटक करण्यात आली असून 2 पुरुष आरोपींचा शोध सुरू आहे. मुलाला त्याच्या आईवडीलाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुलाची चोरी करून विकी करणारे टोळीने अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का,या विषयी अधिकची तपास सुरू आहे.24 तासाच्या आत मुलाला शोधून सुखरूप आईवडीलांच्या स्वाधीन केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

 सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,परिविक्षाधीन सह.पो.अधीक्षक गौरव कायदेपाटील,राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतुत्वात सपोनि.दिपक कांकेडवार,सपोनि.बलराम झाडोकार, पोउपनि.अभिषेक जंगमवार,पोउपनि.विक्की लोखंडे,पोउपनि. सुनिल गौरकार,सफौ.गणनराज करकाडे,पोहवा.संतोष दांडेकर, पोहवा.मोहन निशाद,पोहवा.प्रविण निकोडे,पोहवा.किशोर वैरागडे,पोहवा.अजय बागेसर,पोहवा.इम्रान खान,पोहवा.दिपक डोंगरे,पोहवा.गजानन मडावी,पोशि.हिरालाल गुप्ता,पोअं.शेखर माथनकर,पोशि.शंशाक बदामवार,पोअं.किशोर वाकाटे,पोअं. वैभव गाडगे,पोअं.नरेंद्र वाकडे,मपोअं.अनिता नायडू,पोअं.रिषभ बारसिंगे,मिलींद टेकाम व चंद्रपूर सायबर पोलीस पोअं.अनिमेश भोंगळे यांनी केली असून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी मंचेरिताल(तेलंगणा)पोलीस आयुक्त ए.भास्कर,पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त आर.प्रकाश,पोनि.एस.प्रमोदराव,पोहवा. पोशि.जे.दशरथ,पोशि.एम.लक्ष्मण,पोशि.आर थिरुपती,पोशि. महेश बेबी,पोशि.एम लक्ष्मण,यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

                                  'नागरिकांना आवाहन.'

             चंद्रपूर पोलीसातर्फ चंद्रपूर जिल्ह्यात  "ऑपरेशन मुस्कान" हा भारत सरकार आणि राज्य सरकारचा एक महत्वपुर्ण उपक्रम आहे,ज्याचा उद्देश हरविलेले,पळविलेले बालक,मुलींचा शोध घेणे आहे.तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,आपल्या परिसरात अशा बालकांच्या संबंधाने कोणतीही माहिती असल्यास डायल 112 अथवा 7887890100,या मोबाईल कंमाकावर कळवावे,आपली ओळख गुप्त ठेवण्यात येईल.असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. 

#Chandrapur District Crime News Update.

                                $$$$$$$$$$$$$$$$$$