Accident News : “देवतारी त्याला कोण मारी'ची प्रचिती” भीषण अपघात टळला!|Marathi News.

News@Accident...

Korpana :“देवतारी त्याला कोण मारी” या म्हणीचा जीवंत प्रत्यय 7 फेब्रुवारी रोजी कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरीतील नांदा फाटा बाजारपेठेत आला.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे सिमेंट बल्कर व टाटा एस वाहनामध्ये विचित्र अपघात झाला. टाटा एस भर रस्त्यात उभी करून संबंधित व्यक्ती मालाची डिलिव्हरी देत होता.अशी माहिती आहे.सदर अपघातातील धक्कादायक बाब म्हणजे या दोन वाहनांच्या मधोमध एक दुचाकीस्वार अडकला होता.दैव बलवत्तर म्हणून तो थोडक्यात वाचला.सुदैवाने त्याला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा झालेली नाही.मात्र,त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

 नांदा फाटा परिसरात दिवसेंदिवस वाढते अतिक्रमण,अरुंद रस्ता, यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन याठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत.यावर स्थानिक ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांत संतापाची लाट पसरल्याचे चित्र आहे.भविष्यात गंभीर दुर्घटना होण्यापूर्वी येथील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावणे काळाची गरज बनली आहे.असे असताना आता संबंधित यासंदर्भात काय भुमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

#Accident News in Korpana Taluka.

                     $$$$$$$$$$$$$$$$$$$$