Gadchandur : बंजारा समाजाचे आदर्श,क्रांतिकारी विचारांचे आदर्श दैवत मानले जाणारे 'श्री संत सेवालाल महाराज' यांची 287 वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी 'सदगुरू सेवालाल महाराज बंजारा समाज संस्थान गडचांदूर' तथा येथील बंजारा समाज बांधवांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.संत सेवालाल महाराज मंदिरासाठी घेतलेल्या जागेच्या भव्य पटांगणावर संस्थानचे अध्यक्ष हितेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर कार्यक्रमाचे उद्घाटन राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.बंडू राठोड,मधुकर राठोड,आबाजी चव्हाण,भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,कोरपना तालुका संघटक महामंत्री सतीश उपलेंचवार,महेश घरोटे,विक्की उरकुडे,महेश देवकते,प्रा. चेतना राठोड,यशोदाबाई जाधव,लक्ष्मण भाऊ,भानुदास चव्हाण हरीश घोरे,एम.डी.चव्हाण,पांडूरंग पवार,महेश चव्हाण,मंडळ अधिकारी निवृत्ती चव्हाण,उल्हास पवार,उत्तम जाधव,विनोद चव्हाण व इतरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.संत सेवालाल महाराज,डॉ.रामराव महाराज,हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक आणि काशिनाथ नायक,यांच्या प्रतिमेचे पूजन, भोग,अग्नीहवन करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
समाजातील ज्वलंत समस्या,समाजाच्या विकासात्मक अडचणी, शिक्षण,आरोग्य,पर्यावरणाची समस्या आणि बंजारा समाजाचे ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच गोर बंजारा समाज बांधवांसाठी गडचांदूर येथे संत सेवालाल महाराज भवनाच्या निर्मितीसाठी 25 लक्ष रुपयांचे अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन आ.देवरावदादा भोंगळे यांनी उद्घाटनपर भाषणातून दिले.संस्थानचे अध्यक्ष हितेश चव्हाण,समाज कार्यात अग्रेसर असून सतत समाजहिताच्या कार्यात पुढे असतात.मागील तीन वर्षांपासून संस्थेनी केलेले कार्य तथा भविष्यातील योजना आणि अंमलबजावणी संदर्भात सविस्तर माहिती दिली.संचालक पांडूरंग जाधव,यांनी समाजातील शिक्षण,आरोग्य,शेती व्यवसायावर प्रकाश टाकला.कोषाध्यक्ष कणीराम पवार,यांनी मागील वर्षभरातील कार्य तथा संस्थांच्या भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला.यांच्यासह इतर समाज बांधवांनी संत सेवालाल महाराजांचे विचार,सेवालाल महाराजांचे कार्याचे सविस्तर विशद केले.या दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्सयवरांच्या हस्ते माजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.संचालन उत्तम जाधव,विनोद चव्हाण,प्रास्ताविक दिलीप राठोड,उत्तम जाधव,विनोद चव्हाण,यांनी आभार व्यक्त केले.सदर कार्यक्रमाच्य शस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष हितेश चव्हाण,उपाध्यक्ष रामचंद्र पवार,सचिव उत्तम जाधव,अशोक जाधव,कणीराम पवार,सुभाष जाधव,देवीदास पवार,माधव पवार,दिलीप कुमार राठोड,शिवाजी राठोड,संतोष राठोड,कैलास पवार,वामन जाधव,उल्हास पवार, शंकर राठोड,यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला गडचांदूर व परिसरातील गोर बंजारा समाज बांधव,महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.एकुणच दरवर्षी प्रमाणे यंदाही संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
#Satguru Sewalal Maharaj' Jayanti Celebration.
&&&&&&&&&&&&&&&&&&&&
